Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

मुलगी आणि जावयासोबत मिळून व्हॉट्सएपवरून चालवायची सेक्स रॅकेट, 5 महिलांसहित 9 जण ताब्यात

पॉश परिसरातील प्राइम सिटी कॉलोनीमध्ये दोन महिन्यांपासून किरायाच्या घरात चालू सुरू असलेल्या एका सेक्स रॅकेटचा खुलासा झाला. हे रॅकेट एक महिला आपली मुलगी आणि जावयासोबत मिळून चालवायचे. या प्रकरणी 5 महिलांसहित 9 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ए.एस.पी. प्रशांत चौबे यांनी सांगिते की, पोलिसांना बापट चौकातील तक्रार पेटीत प्राइम सिटी कॉलोनीमध्ये एक महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याची तक्रार मिळाली होती. यावर हीरा नगर पोलिस स्टेशनच्या एस.आय. सुमन तिवारी यांच्या टीमला तिथे पाठवण्यात आले आणि घर नंबर 64 मध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याचा खुलासा झाला.पोलिसांनी सांगितल्यानुसार, सेक्स रॅकेटमध्ये जवाहर मार्ग परिसरात राहणारा संजय रायकवार, परदेशीपुरामध्ये राहणारा अंकित वाडिया, प्राइम सिटीचा रहिवासी नंदकिशोर करोरिया आणि प्रिंस सिटीची रहिवासी प्रिंस कुमार सिंह आणि इतर एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून 24 हजार रूपये कॅश आणि इतर काही सामान जप्त करण्यात आले आहे. सेक्स रॅकेट चालवणारी महिला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तरूणींचे फोटोज ग्राहकांना पाठवायची. या रॅकेटमध्ये काम करणाऱ्या सर्व तरूणी या स्थानिक आहेत. मुख्य महिला या सर्व तरूणींच्या संपर्कात असायची आणि फोन ग्राहकाने विचारणा केल्यावर तरूणींना त्यांच्या फ्लॅटमध्ये पाठवायची. दरम्यान पोलिस स्टेशनच्या अगदी जवळच असलेल्या सेक्स रॅकेटची माहिती इतक्या दिवस पोलिसांना नव्हती का, पोलिसही यात मिळालेले आहेत का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत.

Leave A Comment