Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिन्ही डॉक्टरांचे जामीन फेटाळले

डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीनही महिला डॉक्टरांचे जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळले आहेत.नायर रुग्णालयातील डॉ. पायल हिच्या आत्महत्येप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी याच रुग्णालयातील डॉक्टर हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना अटक केली होती. रॅगिंग तसेच ऍट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या या तिघींनी कोठडीत असतानाच आपल्या वकिलांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.मुंबई सेंट्रल येथील टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दुसऱया वर्षात शिकणाऱया पायल तडवीने नायर रुग्णालयातील वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केली होती.

Leave A Comment