Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

ट्रेनमध्ये सावत्र वडिलानेच केला 5 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, आईने पोलिसांत दिली तक्रार

वडील मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका सावत्र वडिलाने आपल्या 5 वर्षीय चिमुकलीवर ट्रेनमध्ये बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर मुलीच्या आईनेच पोलिसांना तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पोक्सो कायद्या अंतर्गत आरोपीला ताब्यात घेतले आहे.मिळालेल्या माहितीनुसार महिला आधी विधवा होती आणि तिला दोन आपत्ये आहेत, तिचे आरोपीसोबत लग्न झाले. लग्नाच्या काही दिवसानंतर आरोपीने तिला मारहाण करणे सुरू केली. महिलेने सांगितले की, 11 मे रोजी आरोपी तिच्या 5 वर्षीय चिमुकलीला घेऊन चुरूला आला होता आणि येथे उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने ते पाहून आरडा-ओरड सुरू केल्यावर आरोपी महिलेला सिरसाला सोडून आला आणि तिच्या 3 वर्षीय मुलाला मारहाण केली.या प्रकरानंतर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली, त्यानंतर 22 जूनला लक्ष्मणगडमध्ये सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. येथे आल्यावर पीडित मुलगी आणि आरोपीची वैद्यकिय तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर त्याला न्यायालयात सादर केले.

Leave A Comment