Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

14 वर्षांचा वनवास संपला, अयोध्येतील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी 4 आरोपींना जन्मठेप

उत्तर प्रदेशमधील अयोध्यात राम जन्मभूमी परिसरात 5 जुलै, 2005 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मंगळवारी सुनावणी झाली. प्रयागराजच्या विशेष सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर एकाची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. डॉ. इरफान, मोहम्मद शकील, मोहम्मत नसीम आणि फारूख यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, तसेच प्रत्येकी 40 हजारांचा दंडही ठोठावली. मोहम्मद अजीज याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.राम जन्मभूमी परिसरात 5 जुलै, 2005 रोजी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास दहशतावाद्यांनी आत्याधुनिक हत्यारांनी गोळीबार केला, तसेच बॉम्बस्फोट घडवले. यावेळी येथे सुरक्षेसाठी तैनात असणारे अनेक जवान जखमी झाले होते. दहशतवादी आणि जवानांमध्ये यावेळी उडालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता, तर पाच जणांना जिवंत पकडण्यात यश आले होते. या हल्ल्यामध्ये दोन नागरिकांचाही मृत्यू झाला होता, तर सात लोक जखमी झाले होते.पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी जैश-ए-मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांनी अटक केली होती. अटकेनंतर त्यांना प्रयागराजच्या नैनी सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले होते. या प्रकरणी दाखल याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. न्यायालयात 63 लोकांच्या साक्ष तपासण्यात आल्या. 11 जून रोजी दोन्ही पक्षांकडून बाजू मांडण्यात आल्या होत्या. त्यावेळी विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश दिनेश चंद्र यांनी निकालासाठी 18 जून तारीख निश्चित केली होती. हल्ल्यानंतर 14 वर्षांनी निकाल लागला आहे.

Leave A Comment