Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

विक्रोळीत भीषण अपघात, दोघांचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी

विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या दुर्दैवी अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक तीन वर्षांचा लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. वीर सावरकर मार्गावरील कैलास कॉम्प्लेक्सजवळ एका भरधाव टँकरने फुटपाथवर झोपलेल्या तीघांना चिरडले आहे. वाहन चालकाचा टँकरवरील नियंत्रन सुटल्यामुळे अपघात झाला आहे. श्यामा पवार आणि लक्ष्मी वाघमारे अशी मृत्यू पावलेल्या दोघींची नावे आहेत. तर तीन वर्षांचा कार्तिक वाघमारे गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. टँकरचालक फरार असून पोलिसांनी टँकर ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पार्क साईट पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave A Comment