Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

वडिलांसोबत झोपलेल्या 5 वर्षीय चिमुकलीचे केले अपहरण, नंतर बलात्कार करून घेतला जीव

धार्मिक शहर उज्जैनमध्ये मानुसकिला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका 5 वर्षीय चिमुकली आपल्या वडिलांसोबत झोपलेली असताना अज्ञात आरोपीने तिचे अपहरण करून आधी बलात्कार केला आणि नंतर हत्या केली.मुलीच्या वडिलांनी सांगितले की, गुरुवारी रात्री चिमुकली त्यांच्यासोबतच झोपली होती. रात्री 2 वाजता अचानक त्यांना जाग आल्यावर त्यांनी पाहिले की, मुलगी नाहीये. त्यानंतर रात्रभर मुलीचा शोध घेऊन त्यांनी सकाळी 5 वाजता पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करून मुलीचा तपास सुरू केला. शुक्रवारी दुपारी मुलीचा मृतदेह लालपुलच्या जवळील शिप्रा नदीत मिळाला.मुलीच्या अंगावर कपडे नव्हते आणि तिच्या डोक्यात गंभीर जखमा होत्या. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या पोलिस वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजुरांची चौकशी करत आहेत.महाकाल पोलिस स्टेशनचे टीआय अरविंदसिंह तोमर यांनी सांगितले की, चिमुकलीचा मृतदेह जिथे मिळाला आहे, तिथेच रक्ताने माखलेली वीटही मिळाली आहे. या वीटेनेच आरोपीने मुलीच्या डोक्यात वार केले. घटनेत पोलिसांना जवळच्या व्यक्तीचा हात असल्याचा संशय आहे.

Leave A Comment