Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

जम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, चकमक अद्याप सुरूच

जम्मू कश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील वेरिनाग भागात शनिवारी पहाटे जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. अद्याप दोन ते तीन दहशतवादी या भागात लपले असल्याने शोध मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे.ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव इकबाल असून तो जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी होता. गुप्तचर यंत्रणांनी वेरिनाग भागातील एका घरात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी या भागात शोध मोहीम सुरू केल्यानंतर दहशतवादी व जवानांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.

Leave A Comment