Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

अलीगडमधल्या चिमुरडीच्या मारेकऱ्यावर स्वत:च्याच मुलीवर बलात्काराचा आरोप

अलीगडमध्ये 2 वर्षांच्या मुलीचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. कर्जाची परतफेड न केल्याने आरोपींनी आजोबांचा राग मारेकऱ्यांनी निष्पाप मुलीवर काढला, ज्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या मुलीच्या हत्येचा आरोप असलेल्या एका आरोपीवर स्वत:च्याच मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यात आरोपीला जामीन मिळालेला असून तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचं पोलिसांना कळालं आहे.जाहीद आणि त्याच्या सहकाऱ्याने दोन वर्षांच्या मुलीचं घराबाहेरून अपहरण केलं आणि तिची हत्या केली. हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला असावा असा अनेकांनी संशय व्यक्त केला होता मात्र पोलिसांनी तिच्यावर अत्याचार झाले नसल्याचं म्हटलं आहे. इंडीयन एक्सप्रेस या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीमध्ये म्हटलं आहे की या मुलीचा मारेकरी अस्लम याच्यावर 4 गुन्हे दाखल आहेत,ज्यामध्ये अपहरण, लैंगिक छळ आणि बलात्कार या गुन्ह्यांचा समावेश आहे. जाहीदचा साथीदार असलेल्या आरोपीवर त्याच्याच मुलीचा बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी या आरोपीच्या नातेवाईकाने पोलिसांत गुन्हा नोंदवला होता.30 मे रोजी जाहीद आणि त्याच्या साथीदाराने या मुलीचं घराबाहर खेळत असताना अपहरण केलं आणि तिची हत्या करून कचराकुंडीत फेकून दिलं होतं. तीन दिवस या मुलीचा शोध सुरू होता. तीन दिवसांत भटक्या कुत्र्यांनी या मुलीच्या शरिराचे लचके तोडले असावेत असं पोलिसांनी म्हटले आहे. ज्या कचराकुंडीत या मुलीचा मृतदेह सापडला ती जाहीदच्या घराजवळच आहे.

Leave A Comment