Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर दहावीच्या निकालाची तारीख ठरली, 8 जूनला जाहीर होणार निकाल

नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर दहावीचे विद्यार्थी आपल्या निकालाची प्रतिक्षा करत होते, पण त्यांची ही प्रतिक्षा आता संपणार आहे. दहावीच्या निकालाची तारीख आता ठरली आले. दहावीचा निकाल उद्या शनिवारी 8 जून रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे. मागील काही दिवसांपासून दहावीच्या निकालासंबंधीत विविध तारखा फिरत होत्या. पण तो मेसेज चुकीचा असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले होत. त्यानंतर आज अखेर बोर्डाने उद्या 8 जून रोजी दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले आहेदहावीचा निकाल पाहण्यासाठी तुमचा बोर्ड परीक्षा क्रमांक जवळ असायला हवा. जेव्हा तुम्ही रिझल्ट पाहण्यासाठी वेबसाईटवर जाल, तेव्हा कुठल्याही स्पेसशिवाय तुमचा परीक्षा क्रमांक टाईप करा. नंतर आपल्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे टाईप करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा रिझल्ट दिसेल. .

Leave A Comment