Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

खा. नवनीत राणा यांनी अमरावती महानगरपालिकेत बैठक

राजापेठ रेल्वे क्रोसिंगवरील उड्डाणपुलाच भिजतंघोंगड गेल्या ४ वर्षांपासून पडलं आहे. या संदर्भात जाब विचारण्यासाठी खा. नवनीत राणा यांनी अमरावती महानगरपालिकेत बैठक घेतली. राजापेठ येथील अंडरपास १ जुलै पर्यंत सुरु करण्याचं आश्वासन त्यांनी घेतलं आ. रवी राणा देखील या बैठकीत पोहचले त्यांनी ठेकेदार चाफेकर यांचा क्लास घेतला. या बैठकीमध्ये खेड्याना शहर बसने जोडण्याचा मुद्दा तसेच नाले सफाईचा मुद्दा चांगलाच गाजलाच सिटी न्यूजने या बैठकीचं थेट प्रक्षेपण केलं. ते पाहून नागरिकांनी नाले स्वच्छ झाले नसल्याचं आ. राणाना फोन करून सांगितलं. महापालिकेने मात्र कागदोपत्री नाले स्वच्छ झाल्याचं दाखविलाय

Leave A Comment