Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

बर्ड शॉप, डॉग ब्रिडिंग सेंटरची नियमित तपासणी व्हावी - प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीचा निर्णय

जिल्ह्यातील डॉग ब्रिडिंग सेंटर, बर्ड शॉप येथे नियमांचे पालन होते किंवा कसे, याबाबत नियमित तपासणी करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या सभेत घेण्यात आला.निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहोत्रे, सहायक पोलीस आयुक्त ए. एन. कुरळकर, समितीचे सदस्य डॉ. सावन देशमुख, रवींद्र भागवत, अभिषेक मुरके,डॉ. सुनील सूर्यवंशी, विजय गोहत्रे, अजित जोशी, राजेश बुरंगे, डॉ. सचिन बोंडे, सुरेखाताई पांडे, प्रदीप पातुर्डे,अक्षय कात्रे, विजय शर्मा आदी उपस्थित होते. डॉग ब्रिडिंग सेंटर, बर्ड शॉप अधिकृत आहेत किंवा कसे, नियमांचे पालन होते का, याबाबत नियमित तपासणी व्हावी. गोवंशाच्या अनधिकृत वाहतूकीवर वाहन परवाने रद्द करण्याची कारवाई नियमितपणे करावी, असे निर्देश सदस्यांनी यावेळी दिले.कृषी उत्पन्न बाजार समित्यांत जनावरांची खरेदी- विक्री करणा-या विक्रेता व खरेदीदार या दोहोंचे आधारकार्ड घेणे अनिवार्य आहे. तसे पत्रही समित्यांना दिले आहे. चामड्याची अवैध वाहतूक होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबत काटेकोरपणे तपासणी व्हावी. अवैध वाहतूकीवरील कारवाईत पकडलेल्या जनावरांच्या संगोपनापोटी खावटी, विमा देण्याची मागणी आहे. त्याचा पाठपुरावा करण्याचा निर्णय या बैठकीत झाला.

Leave A Comment