Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

लग्नात दुसऱ्या महिलेबरोबर नृत्य केल्यावरून वाद, पत्नीची हत्या

लग्न समारंभ म्हटलं की नृत्य आलंच. त्यातच ते लग्न जर घरातील व्यक्तिचे असेल तर त्यातील नृत्याची धमाल मजा काही औरच. पण जयपूरमध्ये अशाच एका लग्नात दुसऱ्या महिलेबरोबर नाच करणे एकाला महागात पडलं आहे. दुसऱ्या महिलेबरोबर पती नाचत असल्याने पत्नीला राग आला. त्यातून झालेल्या वादात पतीने पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची भयंकर घटना जयपूरमध्ये घडली आहे. काशूराम (60) असे आरोपीचे नाव असून तो फरार आहे. तर भीखली असे त्याच्या पत्नीचे नाव आहे.टिंडोरी गावात राहणारे काशूराम 24 मे रोजी पत्नीसह एका नातेवाईकांच्या लग्नाला गेले होते. घरचेच लग्न असल्याने सगळेजण थट्टा मस्करी करत होते. त्याचवेळी एकाने काशूराम यांना नाचण्याचा आग्रह केला. यामुळे काशूरामही इतरांबरोबर डान्स करू लागले. त्याचवेळी एका गाण्यावर नाचताना काशूराम आणि घोळक्यातील एक महिला समोरासमोर आले. दोघेही नाचण्यात दंग होते. आपला पती दुसऱ्या महिलेबरोबर डान्स करत असल्याचे बघून भिखलीची सटकली.घरी गेल्यावर भिखली व काशूराम यांच्यात या मुद्द्यावरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की चिडलेल्या काशूरामने जवळच पडलेल्या कुऱ्हाडीने भीखलीवर वार केले. त्यात भीखलीचा जागीच मृत्यू झाला. तर भीखलीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले बघून काशूरामने तिथून पळ काढला. दरम्यान, काशूरामवर भारतीय दंड संहिता कलम 302 च्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Comment