Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

काँग्रेसच्या एक्झिट पोलमध्येही युपीएपेक्षा एनडीएला जास्त जागा

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर जाहीर झालेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये एनडीएला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसच्या एक्झिट पोलमध्येही युपीएपेक्षा एनडीएला जास्त जागा मिळतील असे दिसून आले आहे. या एक्झिट पोलनुसार, भारतीय जनता पक्षाच्या 200 च्या आत जागा येतील, तर एनडीएला 230 पर्यंत जागा मिळतील. तर काँग्रेस एकट्याच्या बळावर 140 जागा जिंकेल असाही दावा करण्यात आला आहे. तर युपीएला 195 च्या आसपास जागा मिळतील असेही या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आले आहे.

Leave A Comment