Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

मदतीच्या बहाण्याने रुग्णाच्या नातेवाईकावर बलात्कार

तुमचे वैद्यकीय बिल कमी करून देतो अशी बतावणी करीत शीव रुग्णालयातल्या ओपीडी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर नेऊन एक तरुणाने रुग्णाच्या नातेवाईकावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी शीव पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.सीमा (37, नाव बदललेले) या महिलेची बहीण शीव रुग्णालयात उपचाराकरिता दाखल आहे. बहिणीच्या सेवेसाठी सीमा रुग्णालयात थांबल्या होत्या. गरीब असल्याने रुग्णालयातल्या बिलात काही कमी करता येईल का या प्रयत्नात त्या होत्या. दरम्यान, धारावीत राहणारा दीपक कुंचीकुर्वे (31) हा तरुण सीमा यांना भेटला. मी तुमचे वैद्यकीय बिल कमी करण्यासाठी मदत करतो असे सांगून बिल भरायचा फॉर्म कुठे भेटतो ते दाखवायला दीपक त्यांना ओपीडी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर घेऊन गेला. त्या मजल्यावर अजिबात वर्दळ नसते. त्यात गच्ची जाण्यासाठी असलेला मार्ग बंद असल्यामुळे दीपकने जिन्याच्या आड नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्यांना तेथेच सोडून पळ काढला. तक्रार दाखल होताच शीव पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक ललिता गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यांच्या खबऱयांना कामाला लावले आणि आरोपी दीपक कुंचीकुर्वेला धारावीत अटक केली.तो तरुण मदत करतो असे सांगून पाचव्या मजल्यावर घेऊन गेला. तेथे गेल्यावर त्याने माझ्यावर बलात्कार केला. त्यावेळेस मी खूप घाबरली होती. आरडाओरड केली तर तो मारेल या भीतीपोटी शांत राहिली. मी गरीब असल्याचा त्याने गैरफायदा उचलला, असे सीमा यांनी पोलिसांना सांगितले आहे.

Leave A Comment