Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • अपक्ष उमेदवार काँग्रेस समर्थित नवनीत राणा ३६९५१ मतांनी विजयी
  • राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना दिल्या विजयाच्या शुभेच्छा
  • पालघरमधून शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी
  • बारामती येथून सुप्रिया सुळे विजयी
  • सूरतमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग, 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू
  • सूरत अग्नीतांडवप्रकरणी मालकासह तिघांना अटक, अनधिकृतपणे सुरू होते क्लासेस

भाजप नेत्याला मारहाण करून रेल्वेतून फेकले खाली, जुन्या वादातून हे कृत्य केल्याचा संशय, अज्ञातांविरूद्ध तक्रार दाखल

मटेरा येथील आयोजित मंगळीक कार्यक्रमातून रविवारी रात्री उशीरा ट्रेनमधून परत येत असताना भाजप नेत्याला काही लोकांनी मारहाण करून गाडीतून खाली फेकले. गंभीर अवस्थेत त्यांना सीएचसी रूग्णालयात दाखल केले गेले. या प्रकरणात दोन ओळखीच्या आणि तीन अज्ञात व्यक्तींविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पीडीत व्यक्तीचा आरोप आहे की, सुडभावनेने हा गुन्हा केला आहे.दरगाह शरीफ परिसरातील सलारगंज परिसरातील निवासी राम आशीष सिंह(40) भाजप युवा मोर्चाचे विशेष कार्यकारिणी सदस्य आहेत. ते आयटी सेलचे काम देखील पाहतात. त्यांनी सांगितले की, मटेरा येथे एका नातेवाईकाच्या मंगळाचा कार्यक्रम करून ते ट्रेनद्वारे बहराइचला परत येत होते, पण ट्रेनमध्ये खूप गर्दी असल्यामुळे ते जागा शोधत होते तेव्हा ट्रेनमध्ये त्यांना रंजीत गुप्ता, गीता साहू भेटले.ट्रेनमध्ये या दोघांचे काही तरी षडयंत्र सुरू होते. त्याच षडयंत्रातून त्यांनी मला मारहाण करण्यास सुरूवात केली आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य तीन लोकांनीही मला मारले. त्यांनतर धावत्या रेल्वेतून त्यांनी मला रिसिया-मटेरा दरम्यान खाली ढकलून दिले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून ग्रामस्थांनी त्यांना सीएचसी रिसिया येथे दाखल केले केले. तेथे प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी त्यांनी जिल्हा रूग्णालयात पाठवले.

Leave A Comment