Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीला आईनेच संपवले, डोक्यात घातला दगड

पुरोगामी महाराष्ट्र पुन्हा एकदा ऑनर किलिंगच्या घटनेने हादरला आहे. बारामतीच्या प्रगतीनगर भागामध्ये जन्मदात्या आईने मुलीच्या डोक्यामध्ये दगड घालून निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली. मुलीची हत्या केल्यानंतर आईने पोलिसांपुढे शरणागती पत्करली आणि हत्येची कबुली दिली आहे. हत्या झालेल्या मुलीचे नाव ऋतुजा हरीदास बोभाटे (19) असे आहे, तर आरोपी आईचे नाव संजीवनी हरीदास बोभाटे असे आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृतक ऋतुजा हिने काही दिवसांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. परंतु विवाहानंतरही मुलगा तिला नांदवण्यासाठी नेत नसल्याने ती माहेरीच राहात होती. तसेच तिने नवऱ्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रारही दिली होती. मुलीच्या आईनेही जावयाच्या समजूत काढण्याचा प्रयत्न करून पाहिला, परंतु त्याचा काहीही परिणाम झाला होता.मिळालेल्या माहितीनुसार, मृतक ऋतुजा हिने काही दिवसांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. परंतु विवाहानंतरही मुलगा तिला नांदवण्यासाठी नेत नसल्याने ती माहेरीच राहात होती. तसेच तिने नवऱ्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रारही दिली होती. मुलीच्या आईनेही जावयाच्या समजूत काढण्याचा प्रयत्न करून पाहिला, परंतु त्याचा काहीही परिणाम झाला होता.

Leave A Comment