Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

चोरीची मंगळसूत्र-बांगड्या विकतानाच पोलिसांची धाड, साडेतीन लाखाचा माल जप्त

रहाटाघर येथील झोपडपट्टीत चोरीच्या दागिन्यांची आणि अन्य वस्तूंची विक्री सुरू असल्याची माहिती रत्नागिरी शहर पोलिसांना मिळताच दोघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडील 3 लाख 48 हजार 523 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. रहाटाघर येथे चोरीच्या मालाची विक्री होत असताना रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी धाड टाकून रेखा काशीनाथ जाधव (वय 38) आणि बाळू माने (वय 19) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील 3 लाख 48 हजार 523 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यामध्ये 1 लाख 11 हजार रुपयांचे मंगळसूत्र, 48 हजार 640 रुपयांचा सोन्याचा हार, 71 हजार 418 रुपये किमंतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या 8 हजार 960 रुपयांचे दोन आणि 15 हजार 360 रुपयांच्या कानातल्यासह अन्य दागिन्यांचा त्यामध्ये समावेश आहे.

Leave A Comment