Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

पायलट झोपला ! तरीही 40 मिनिटे उडत राहिलं विमान

शीर्षक वाचून बुचकळ्यात पडला असाल ना? पण हो, असं खरोखर झालं आहे. ऑस्ट्रेलियातल्या एका प्रशिक्षणार्थी वैमानिकाने जवळपास झोपेतच विमान उडवलं आणि तेही थोडीथोडकी नाही तर तब्बल 40 मिनिटे. त्यामुळे विमान उडून प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन पोहोचलं आणि एकच गडबड सुरू झाली.नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अॅडिलेड इथल्या एका फ्लाईट ट्रेनिंग संस्थेतून हा पायलट प्रशिक्षण घेत आहे. शुक्रवारी त्याने पूर्ण झोप न घेताच विमान उडवायला सुरुवात केली. त्यापूर्वी त्याने पोटभर नाश्ताही केला नव्हता. त्यामुळे त्याला झोप आली आणि त्याने विमान ऑटोपायलट मोडला टाकलं. पण तो तब्बल 5500 मीटर उंचीवरून 40 मिनिटे विमान उडवत होता आणि विमानाने अॅडिलेड येथील विमान प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केला. या क्षेत्रातील ट्रॅफिक कंट्रोल ऑफिसने त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्नही करून पाहिला. पण, पायलट झोपला असल्याने त्याला हे संदेश कळलेच नाहीत. काही वेळाने पायलटला जाग आल्यानंतर तो सुखरूप खाली आला पण तोवर इथे खळबळ माजली होती.या प्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या हवाई प्राधिकरणाने चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार आता त्याच्यावर कारवाई होणार असून, उड्डाणापूर्वीच्या शारीरिक स्थितीचेही नियम सक्तीने लागू करण्यात येणार आहेत.

Leave A Comment