Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

तिवसा तालुक्यातील वणी गावातील परिसरात भीषण आग

तिवसा तालुक्यातील वणी ममदापुर गावातील 12च्या सुमारास गावा नजीकच्या शेताच्या धुऱ्याला आग लावण्यात आली होती,ही आग पेटत गावाच्या दिशेने आली, ही आग इतकी भयंकर होती कि काही क्षणातचं उग्र होऊन गावा जवळ पोचली या आगीमध्ये गावाशेजारी संत्रा बागा जळून खाक झाल्या, दुचाकी,व गुराढोराचा चारा पूर्णपणे जळून खाक झाला , आग लागताच नागरिकांची पळापळ झाली हा अग्नी तांडव पाहून गावातील नागरिकांनी आपल्या शेतातील मोटार पंपाच्या मदतीने व घरातील भांडी कुंडी आणून ही आग वीजवण्याचा आटोकात प्रयत्न केला मात्र ही आग इतकी भयानक होती कि गावाच्या जवळ काही क्षणातचं पोचली व गावकर्यांनी आपल्या कोठयातील गुराढोराना सोडून आग वीजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, त्यानंतर एका तासांनी धामणगाव रेल्वे,आष्टी,आर्वी व चांदुररेल्वे नगरपरिषदच्या अग्निशमन गाड्या दाखल झाल्या दीडतासांनी आग वीजवण्यात यश आले, यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली,तसेच तिवसा तहसील, तिवसा पोलीस प्रशासनातील अधिकारी व महाराष्ट्र राज्य महावितरण सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते.

Leave A Comment