Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • अपक्ष उमेदवार काँग्रेस समर्थित नवनीत राणा ३६९५१ मतांनी विजयी
  • राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना दिल्या विजयाच्या शुभेच्छा
  • पालघरमधून शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी
  • बारामती येथून सुप्रिया सुळे विजयी
  • सूरतमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग, 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू
  • सूरत अग्नीतांडवप्रकरणी मालकासह तिघांना अटक, अनधिकृतपणे सुरू होते क्लासेस

राज्यात उष्माघाताने सात जणांचा मृत्यू, 303 रुग्णांवर उपचार सुरू

राज्यात उष्माघाताने सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर 303 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उष्माघाताने संभाजीनगर आणि हिंगोलीमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर बीड, धुळे आणि परभणीत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार 15 मार्च ते 5 मे या दरम्यान या सात रुग्णांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. तर राज्यात 303 रुग्णांवर उपचार सुरू आहे. सर्वाधिक रुग्ण अकोल्यात असून त्यांची संख्या 138 आहे. तर त्यानंतर नागपूरमध्ये 112, लातूर जिल्ह्यात 41, नाशिक आणि संभाजीनगरमध्ये प्रत्येकी 6 रुग्णांवर उपचार सुरू आहे.रविवारी परभणी आणि जालन्यात 42 अंश तापमन पोहोचले होते. तर गेल्या महिन्यात विदर्भात तापमान 47अंशांपर्यंत पोहोचले होते. पुढील काही दिवसांत मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची लाट निर्माण होण्याई शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Leave A Comment