Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

अमरावती महानगरपालिका मनपामध्‍ये विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

रविवार दिनांक 14 एप्रिल,2019 रोजी विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्‍य मा. महापौर संजय नरवणे यांचे शुभहस्‍ते विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस हारार्पण विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्‍यात आले. यावेळी उपमहापौर संध्‍याताई टिकले, मनपा आयुक्‍त संजय निपाणे, विरोधी पक्षनेता बबलु शेखावत, गटनेता चेतन पवार, झोन सभापती सोनाली नाईक, नगरसेव‍क प्रकाश बनसोड, विलास इंगोले, नगरसेविका सुरेखा लुंगारे, जयश्री डहाके, नुतन भुजाडे, स्‍वाती कुलकर्णी, उपआयुक्‍त महेश देशमुख, सहाय्यक आयुक्‍त योगेश पिठे, नगरसचिव संदिप वडुरकर, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, कार्यालय अधिक्षक शैलेश वैद्य, जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक धनंजय शिंदे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.त्‍यानंतर विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन चौक) येथील विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास हारार्पण करण्‍यात आले.

Leave A Comment