Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

मतदानाकरीता जिल्हा प्रशासन सज्ज

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात अमरावती लोकसभा मतदार संघात १८ एप्रिलला मतदान होत असून, त्यादृष्टीने प्रशासन सज्ज झाले आहे. नागरिकांनी यादिवशी आपले मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे. जिल्ह्यात स्वीप मोहिमेत सर्वदूर जनजागृतीसह आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. स्वीप मोहिमेत विविध विभागांनी गावोगाव शेकडो कार्यक्रम, ईव्हीएम- व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिके घेतली आहेत. मतदाराचे हक्क, कर्तव्य व जाणीवजागृतीचे कार्य या मोहिमेतून होत आहे. या मोहिमेत आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामसेवक, ग्राम रोजगारसेवक यांच्यासह सर्व यंत्रणाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. नागरिकांनीही मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.निवडणूकीसाठी मनुष्यबळाला तीन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले आहे. ईव्हीएम- व्हीव्हीपॅट यंत्रणेच्या तपासण्या, सरमिसळीकरण आदी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मतदान केंद्रावर लागणा-या सुविधांबाबत यापूर्वीच निर्देश देण्यात आले असून, तशी तजवीज करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, पीडब्ल्यूडी ॲप आदी सुविधा आहेत. दिव्यांग मतदारांत जागृतीसाठी कार्यशाळाही घेण्यात आल्या आहेत. नवमतदारांमध्ये जागृतीसाठी पथनाट्य, प्रात्यक्षिके, सेल्फी पॉईंट असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

Leave A Comment