Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

मतदान जागृतीचा संदेश आता दुग्ध उत्पादनांवर

मतदान जागृतीसाठी स्वीप मोहिमेत जिल्ह्याने आघाडी घेतली असून, मतदान जागृतीचा संदेश आता दुग्ध उत्पादनांवरही प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लक्षावधी नागरिकांपर्यंत हा संदेश पोहोचविण्यासाठी मदत होणार आहे.मतदानाचे राष्ट्रीय कार्य, महत्व, नागरिकांचे कर्तव्य व अधिकारी याबाबत जागृतीसाठी व संदेशवहनासाठी नानाविध माध्यमांचा वापर करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते. त्यानुसार स्वीपच्या नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी जनजागृतीसाठी पारंपरिक व नव्या माध्यमांचाही मोठ्या प्रमाणावर विविध विभागांनी वापर करावा, असे निर्देश दिले. त्यानुसार पशुसंवर्धन विभागानेही कामात आघाडी घेत संदेशवहनासाठी दुग्ध उत्पादनांचा वापर केला आहे.विविध कंपन्यांच्या दुध, तूप आदी उत्पादनांच्या पाकिटावर पशुसंवर्धन विभागातर्फे स्टीकर्स लावण्यात येत आहेत. वनविभागानेही स्वीप मोहिमेत आघाडी घेतली आहे. चिखलदरा व मेळघाटातील विविध गावांत वनविभागाकडून मतदार जागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. चांदूर बाजार तालुक्यातील दिव्यांग मतदारांसाठी जनजागृती मेळावा आज घेण्यात आला. मतदान केंद्रावर उपलब्ध सुविधांबाबत माहिती देण्यात आली, तसेच अंध मतदारांना ब्रेल लिपीच्या सहाय्याने कशाप्रकारे मतदान करता येईल, याचे मार्गदर्शन करण्यात आले. दर्यापूर येथील जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून भव्य रॅली काढण्यात आली.

Leave A Comment