Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

अमरावती महानगरपालिका मनपामध्‍ये महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांची जयंती साजरी

गुरुवार दिनांक 11 एप्रिल,2019 रोजी महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांची जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. महात्‍मा ज्‍योतिबा फुले जयंती निमित्‍य मा. उपमहापौर संध्‍याताई टिकले यांचे शुभहस्‍ते महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांचे प्रतिमेस हारार्पण विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्‍यात आले. यावेळी मनपा आयुक्‍त संजय निपाणे, नगरसेव‍क मिलींद चिमोट, चंद्रकांत बोमरे, अजय सारसकर, नगरसेविका वंदना मडघे, सुनिता भेले, सुरेखा लुंगारे, सहाय्यक आयुक्‍त योगेश पिठे, नगरसचिव संदिप वडुरकर, उद्यान अधिक्षक प्रमोद येवतीकर, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, कार्यालय अधिक्षक शैलेश वैद्य, अभियंता लक्ष्‍मण पावडे, जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक धनंजय शिंदे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्‍यानंतर चित्रा चौक येथील महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांचे पुतळ्यास हारार्पण करण्‍यात आले.

Leave A Comment