Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

क्लब फूट बाधित बालकांसाठी उपचार कक्ष

अमरावती, दि. 22: क्लब फूट बाधित लहान मुलांच्या उपचार कक्षाचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्या हस्ते इर्विन रूग्णालयात नुकतेच झाले. क्युअर इंटरनॅशनल इंडिया ट्रस्ट ही संस्था लहान मुलांच्या जन्मजात पायाच्या वाकडेपणापासून सुटका मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. क्लब फूट ही सर्वसामान्यपणे एक जन्मजात विकृती असून यामध्ये पाय आतल्या बाजूला वळलेले असतात. जर या विकृतीवर वेळीचा उपचार केला नाही तर बालक कायमचे दिव्यांग होऊ शकते. त्यामुळे पायाचे व्यंग असणाऱ्या बालकावर लहानपणी वेळीच उपचार झाल्यास त्यांना दिव्यांग होण्यापासून वाचवू शकतो. तसेच पोन्सेटी प्लास्टर उपचार पद्धती अतिशय सोपी, प्रभावी व स्वस्त असून जिल्हा सामान्य रुग्णालय येथे अशा बालकांवर मोफत उपचार केले जाणार आहे. त्यामुळे क्लबफुट बाधित लहान मुलांनी या विशेष उपचार पद्धतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. श्यामसुंदर निकम यांनी केले आहे. या केंद्रामार्फत दर शनिवारी ओ.पी.डी. क्र.12 मध्ये क्लबफुट बाधित मुलांना पोन्सेटी उपचार केले जाईल व विशेष बुट देण्यात येईल, असे डॉ. निकम यावेळी म्हणाले. अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. कुर्तकोटी, बालरोग तज्ज्ञ डॉ. नितीन दातीर, डॉ. गणोरकर, डॉ.दाळू, डॉ. संदीप खांडे, मेट्रन मंदा गाढवे, आरबीएसके विभागाचे निलेश पुनसे व सी.आय.आय.टी. या संस्थेचे राज्य प्रबंधक सचिन पोळ उपस्थित होते. उद्धव जुकरे यांनी सूत्रसंचालन केले. मीनल कोकाटे यांनी आभार मानले.

Leave A Comment