Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • शेत शिवारात वीज पडून मधू गोविंद गयने या गवळी समाजाचा युवक यांचा मृत्यू

शेतकऱ्यांनी आधारकार्ड संलग्न बँक खात्याशी लिंक करण्याचे आवाहन

अमरावती, : हंगाम 2017-18 मध्ये एनईएमएल पोर्टलवर तूर व हरभरा खरेदीकरीता नोंदणी झालेल्या परंतू खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल 1 हजार रूपये अर्थसहाय्य मिळणार आहे. त्याचे वितरण पोर्टलमध्ये नोंदणी केलेल्या आधार कार्डशी संलग्न बँक खात्यात केले जाईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी संबंधित तालुका शेतकी खरेदी विक्री संस्थेमध्ये जाऊन आधारलिंक असलेले बँक खाते क्रमांकच्या पासबुकाची झेरॉक्स प्रत सादर करावी. त्याचप्रमाणे आधार कार्डची झेरॉक्सप्रत सोबत ठेवावी. सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी यांनी केले आहे

Leave A Comment