Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

लोकसभा निवडणूक प्रक्रियेबाबत अधिकारी- कर्मचा-यांना प्रशिक्षण

अमरावती, : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या राष्ट्रीय कार्याप्रती आपल्या कर्तव्याची जाणिव ठेवून व सजग राहून निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे केले. निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी व कर्मचा-यांना विधानसभा मतदारसंघनिहाय प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यानुसार आज येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण झाले. त्यावेळी श्री. नवाल बोलत होते. ईव्हीएमसह व्हीव्हीपॅटचा वापर हे यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य असून, त्यामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शी झाली आहे. या महत्वाच्या कार्यात आपला सहभाग घेण्यात आला असून, आपणही आपले राष्ट्रीय कर्तव्य कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन श्री. नवाल यांनी केले. अमरावतीसह चांदूर रेल्वे, तिवसा, दर्यापूर, मोर्शी येथे प्रशिक्षण झाले. बडनेरा मतदारसंघासाठी नियुक्त सुमारे 2 हजार, प्रशिक्षणार्थ्यांना आज प्रशिक्षण देण्यात आले. तिवसा मतदारसंघातील 1128, धामणगाव मतदारसंघातील 1745, दर्यापूरमधील 805, मोर्शीमधील 753 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी निवडणूक प्रक्रियेच्या मतदार यादी, केंद्र रचना व जबाबदा-या आदी विविध बाबींसह ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रणेचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले. उद्या दर्यापूर व मोर्शी येथे केंद्राध्यक्ष यांचे, मेळघाटसाठीचे प्रशिक्षण दि. 22 व 23 रोजी धारणी येथे होईल. अमरावती विधानसभा मतदारसंघासाठाचे प्रशिक्षण दि. 23 मार्चला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात होईल.

Leave A Comment