Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ चार अर्ज दाखल

अमरावती-अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या (७) सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज चार नामनिर्देशन पत्रे दाखल झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोगाने जाहीर केलेल्या विहित वेळेत अर्थात दुपारी तीन वाजेपर्यंत आज चार उमेदवारांकडून अर्ज दाखल झाले. उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे - श्रीमती नवनीत रवी राणा (युवा स्वाभिमान पक्ष), श्री. शैलेंद्र तुकाराम कस्तुरे (अपक्ष), श्री. सारंग दादाराव ढोके (अपक्ष) व श्री. अंबादास श्यामराव वानखडे (अपक्ष). जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल, उप निवडणूक निर्णय अधिकारी उदय राजपूत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील उपस्थित होते.

Leave A Comment