Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

कार्यशाळेत कलापथकाच्या माध्यमातून मतदार जनजागृती

भारत सरकारच्या फिल्ड आउटरिच ब्यूरो अमरावती व नोडल अधिकारी, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019, अमरावती यांच्या वतीने स्वीप कार्यक्रमांतर्गत सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 करिता मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ग्रामिण भागात कार्यरत आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मतदनीस आणि महिला बचत गटाच्या CRP यांची आज भातकुली पंचायत समितीच्या सभागृहात तालुकास्तरीय मतदार प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी आणि एम.एस.आर.एल.एम चे तालुका समंवयक आदि मान्यवर उपस्थित होते. आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत बुलडाणा येथून आलेल्या शाहिर डी.आर इंगळे कलापथकाकडून मतदाना विषयी विविध गीत व नाटिकाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. यावेळी उपस्थित तालुक्यातील आंगणवाडी सेविका, मदतनीस, आशाताई आणि महिला बचत गटाच्या सदस्यांना ईव्हीएम आणि वीवीपैट मशीनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले तसेच मतदानाची शपथ देखील देण्यात आली.

Leave A Comment