Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

लढवय्या महामेरूची ज्योत निमाली; गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन

पणजी :गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर (वय ६३) यांचे आज (ता.१७) निधन झाले. पर्रीकर यांच्यावर त्यांच्या निवासस्थानीच डॉक्टरांच्या पथकाकडून अत्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू होते. प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने कालपासून पर्रीकरांविषयी विविध अफवांना ऊत आला होता. आज पुन्हा त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाल्याचे गोवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करून स्पष्ट करण्यात आले. स्वादुपिंडाच्या कर्करोगाने पर्रीकर त्रस्त होते. पर्रीकर यांच्यावर अमेरिका आणि दिल्लीच्या एम्समध्येही उपचार करण्यात आले होते.

Leave A Comment