Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व में ६,२२, ३४३ कोरोना वायरस संक्रमित , मौत २८,८०२ और १९९ देश प्रभावित |
  • महाराष्ट्र में कुल कोरोना संक्रमित १८६ और ४ की मौत |
  • पुणे ३० , मुंबई ६७ , नागपुर ९ , ठाणे ४ , यवतमाल ३ , सांगली २४
  • भारत देश में कोरोना वायरस से संक्रमित लोगो की संख्या १००३ के करीब और २१ की मौत की पुष्टि | २५ राज्य प्रभावित |
  • महाराष्ट्र में संचार बंदी लागु सभी सीमाएं सील की गयी | अंतरजिल्हा सीमाएं भी सील की गयी |
  • संक्रमण के चलते लोगों के एकत्र होने पर प्रतिबंध हैं और सड़क, रेल एवं हवाई यातायात पर 31 मार्च तक रोक । सिर्फ मालगाड़ी चलेगी |
  • महाराष्ट्र में कर्फ्यू लागू हो गया है | बिना वजह सड़क पर निकलने वालों से पुलिस सख्ती से पेश आ रही है | जरूरत पड़ने पर पुलिस उनपर लाठी भी बरसा रही है|

एमसीएमसी च्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

अमरावती, : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन होण्याच्या दृष्टीने ‘एमसीएमसी’ने पेड न्यूज व सोशल मिडीयावरील मजकुरासंदर्भात सजगतेने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीची (एमसीएमसी) बैठक आज झाली. त्यावेळी ते बोलत होते. समितीचे सदस्य उपनिवडणूक निर्णय अधिकारी उदय राजपूत, आकाशवाणीच्या केंद्रप्रमुख सुनालिनी शर्मा, सायबर सेलचे पोलीस अधिकारी कांचन पांडे, जनसंवाद विभागप्रमुख डॉ. कुमार बोबडे, सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आदी यावेळी उपस्थित होते. निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना, आदेश व भारतीय प्रेस परिषदेच्या नियमानुसार मजकूर तपासणीचे काम नियमितपणे करावे. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुराबाबत वेळेत कार्यवाही होणे आवश्यक आहे, असे श्री. नवाल यांनी सांगितले. सोशल मिडियावरील माहिती प्राप्त करून घेण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे, असे श्री. पांडे यांनी सांगितले. उमेदवारांचा निवडणूक खर्च मोजण्यासाठी दरनिश्चितीबाबतही यावेळी चर्चा झाली. दरम्यान, जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी नोडल अधिका-यांची सायंकाळी बैठक दिवसभरातील कामकाजाच्या प्रगतीचा आढावा घेतला. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता व निवडणूक कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी राजकीय प्रतिनिधींची बैठक सोमवारी (दि. 18) जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.

Leave A Comment