Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

शहरासह ग्रामीण भागातही मतदान जनजागृतीसाठी मोहिम जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री

अमरावती, : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागातही मतदार जनजागृतीची प्रभावी मोहिम दि. 15 मार्च ते 15 एप्रिल या कालावधीत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती स्वीप च्या नोडल अधिकारी तथा जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी आज दिली. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरीय व गावपातळीवरील यंत्रणेचा सहभाग घेऊन गृहभेटी, प्रभातफेरी, कार्यशाळा आदी कार्यक्रम गावोगाव राबविण्यात येणार आहेत. गावपातळीवरील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच महिला बचत गटाच्या समन्वयक यांच्या कार्यशाळा आयोजित करुन त्यांना निवडणुकीच्या दृष्टीने मतदार जागृतीसाठी अधिक सक्रिय करण्यात येणार आहे. बचतगट, स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून गृहभेटी, जनजागृती, प्रभातफेरी, अपंग, महिला, नवमतदार यांच्या मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रबोधन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी फलक, संदेश प्रसारण, जिंगल्स आदी माध्यमांचा वापर व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे, असे श्रीमती खत्री यांनी सांगितले.

Leave A Comment