Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

चुनावी पाठशाळा उपक्रमाबाबत शाळांना आदेश

अमरावती, : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर चुनावी पाठशाळा उपक्रम राबविण्यासाठी सहभाग देण्याबाबत जिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक व आदिवासी विकास विभागाच्या शाळा, सर्व खासगी शाळांना आदेशित करण्यात आले आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी निलिमा टाके, प्राथमिक शिक्षणाधिकारी रामभाऊ तुरणकर यांनी शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवून आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याबाबत सूचित केले आहे. चुनावी पाठशाळा या उपक्रमाद्वारे संभाव्य व नव्या मतदारांना, तसेच नागरिकांना ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची ओळख, नैतिक जबाबदारींची जाणीव विकसित करणे आदींबरोबरच मतदानासाठी पात्र व्यक्तींना मतदान नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन करुन माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

Leave A Comment