Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

प्रतिबंध कार्यवाहीबाबत जिल्हा दंडाधिकाऱ्याकडून आदेश जारी

अमरावती, : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 नुसार शस्त्रबंदी लागू केली आहे. निवडणुकी दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील सर्व गावांत कोणत्याही शस्त्र परवानाधारकास शस्त्र वाहून नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. नियम भंग करणाऱ्या व्यक्तीवर दंडनीय कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या कामकाजात व्यत्यय निर्माण होऊ नये म्हणून 200 मीटर परिसरात शांतताभंग करणाऱ्या कृतीस प्रतिबंध करण्यात आला आहे.

Leave A Comment