Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • अपक्ष उमेदवार काँग्रेस समर्थित नवनीत राणा ३६९५१ मतांनी विजयी
  • राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना दिल्या विजयाच्या शुभेच्छा
  • पालघरमधून शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी
  • बारामती येथून सुप्रिया सुळे विजयी
  • सूरतमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग, 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू
  • सूरत अग्नीतांडवप्रकरणी मालकासह तिघांना अटक, अनधिकृतपणे सुरू होते क्लासेस

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अपप्रकार रोखण्यासाठी काटेकोर प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी -जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती, दि. 12 : निवडणुकीच्या काळात सर्व अधिका-यांनी त्यांच्या जबाबदा-या योग्य पद्धतीने पार पाडाव्यात, कायदे व सुव्यवस्थेसाठी हत्यारबंदी, अनधिकृत मद्य आदींबाबत आवश्यक तिथे धाडी आदी प्रतिबंधात्मक कार्यवाही काटेकोरपणे करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी विविध शासकीय यंत्रणांच्या कामाचा आढावा घेतला. आज त्यांनी नेमाणी गोडाऊन येथे स्ट्रॉंगरूमच्या दृष्टीने परिसराची पाहणी केली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील उपस्थित होते. जिल्हाधिका-यांनी आज कायदा व सुव्यवस्थेबाबत काटेकोर कारवाईचे निर्देश पोलीस यंत्रणेला दिले. कलम 144 नुसार करावयाची कार्यवाही आदी प्रक्रिया नियमितपणे करावी. अवैध दारुसाठा रोखण्यासाठी धाडी आदी प्रक्रिया राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियमित करावी. जिल्ह्यात कुठेही अनधिकृत फलक दिसता कामा नये. महापालिकेकडून कार्यवाही होत आहे. त्याचप्रमाणे, सर्व ठिकाणी व्हावी. निवडणुका शांततेत आणि मुक्त वातारणात पार पाडण्याचे भारत निवडणूक आयोगासमोरचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार काटेकोरपणे काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. मतदारांना मतदार यादीमधील नोंदी पडताळण्यासाठी व त्यांचे नाव नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिमेअंतर्गत ठोस माध्यम म्हणून संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्यानुसार 1950 या टोल फ्री क्रमांक सुरु आहे. त्यावर आजपावेतो प्राप्त 490 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. सिटीजन व्हिजिलन्सअंतर्गत ‘सी-व्हिजिल’ हे नवे मोबाईल ॲप निवडणूक आयोगाने उपलब्ध केले आहे. कोणताही नागरिक निवडणूकी दरम्यान होणाऱ्या आदर्श आचार संहिता उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाईन करू शकणार आहे. या तक्रारीवर अवघ्या 100 मिनीटात कार्यवाही होणार आहे. त्यामुळे हे ॲप नागरिकांसाठी प्रभावी अस्त्र तर निवडणूक आयोगाचा तिसरा डोळा ठरणार आहे. कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास या ॲपचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Leave A Comment