Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 महिला दिना निमित्त मतदार जागृती रॅली

अमरावती, दि. 8 : महिला दिना निमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदार जागृती रॅलीचे आयोजन आज शहरात करण्यात आले. मतदार जागृती रॅलीला स्वीप मोहिमेच्या नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. या रॅलीमध्ये महानगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, राष्ट्रीय सेवा योजना, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसेवक, शिक्षक आणि गावातील नागरिक, बचतगट कार्यकर्त्या इत्यादींचा सहभाग होता. रॅलीत नवमतदारांची नोंदणी, मतदार जागृती, अधिकाधिक मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे, मतदानासाठी शपथ घेऊन निकोप लोकशाहीचे महत्व संदेश, घोषणा व संवादाव्दारे पटवून देण्यात आले. नागरिकांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, तसेच नोंदणी नसलेल्या नागरिकांनी नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन श्रीमती खत्री यांनी यावेळी केले. दरम्यान स्वीप मोहिमेच्या बाबत जनजागृतीसाठी अंगणवाडी, शाळा व विविध गावांमध्ये कार्यशाळांचे आयोजनही करण्यात आले.

Leave A Comment