Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

कारंजा टर्मिनलचे उद्घाटन किनारपट्टीवरील बंदराचे वेगाने अत्याधुनिकरण

मुंबई, : सागरमाला योजनेंतर्गत राज्य सरकारला केंद्राने भरीव आर्थिक निधी दिला असून त्यातून किनारपट्टीवरील बंदराचे, रस्त्यांचे वेगाने अत्याधुनिकरण होत आहे. त्यामुळे उद्योगवाढीला चालना मिळाली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे कारंजा बंदराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, उद्योग वाढीसाठी बंदरांचा विकास महत्त्वाचा ठरतो. राज्याला लाभलेल्या किनारपट्टीवरील मोडकळीस आलेल्या अनेक बंदराचा विकास केलेला असून काही ठिकाणी नवीन बंदरे, जेटी उभारण्यात येत आहेत. बंदराला जोडणारे चांगले रस्ते निर्माण केले आहेत. सागरी मार्ग हा राष्ट्रीय महामार्गाशी आणि रेल्वे जाळ्यांशी जोडला गेल्याने दळणवळण जलदगतीने सुरु झाले आहे. चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यानेच जगभरातील उद्योजक राज्यात येऊन गुंतवणूक करत आहेत. जेएनपीटी हे भारतातील मोठे बंदर असून राज्यातील मालाची आयात-निर्यात येथून मोठ्या प्रमाणात होते. या बंदराच्या जवळच असलेल्या कारंजा बंदरामुळे येथील व्यापार - उद्योग अधिक गतिमान होईल. अतिशय कमी कालावधीत हे बंदर उभारले असून भारतातील ते खासगी असे अत्याधुनिक बंदर आहे. या बंदराचा उपयोग परिसरातील उद्योग वाढीसाठी होईल. देश-विदेशातील उद्योजक, व्यावसायिक, व्यापाऱ्यांना या बंदराचा चांगला उपयोग होईल. देशातील बंदराचा विकास करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘सागरमाला’ प्रकल्पांतर्ग

Leave A Comment