Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • अपक्ष उमेदवार काँग्रेस समर्थित नवनीत राणा ३६९५१ मतांनी विजयी
  • राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना दिल्या विजयाच्या शुभेच्छा
  • पालघरमधून शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी
  • बारामती येथून सुप्रिया सुळे विजयी
  • सूरतमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग, 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू
  • सूरत अग्नीतांडवप्रकरणी मालकासह तिघांना अटक, अनधिकृतपणे सुरू होते क्लासेस

लोकराज्यचा महिला विशेषांक प्रकाशित

मुंबई, : विविध क्षेत्रात धाडसाने प्रवेश करून, त्यात आपला ठसा उमटवणाऱ्या महिलांच्या प्रेरणादायी यशकथांचा समावेश असलेल्या लोकराज्यच्या महिला विशेषांकाचे प्रकाशन महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज येथे झाले. मराठी, हिंदी, गुजराती व उर्दू अशा चार भाषांमध्ये प्रकाशित झालेल्या या अंकाच्या अतिथी संपादक महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनिता वेद सिंगल आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात हा प्रकाशन सोहळा पार पडला. लोकराज्यच्या या अंकात, सर्वसमावेशक अशी स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्याबाबत ‘जेंडर बजेट’ संकल्पनेवर माहिती देण्यात आली आहे. यशस्वी महिलांच्या प्रेरणादायी यशकथांबरोबरच महिला सुरक्षा अॅप्स, महिलांसाठी सायबर सुरक्षा, महिलांसंबंधी महत्वपूर्ण कायदे, महिला आयोग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दीनिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा आढावा तसेच नोंदणी व मुद्रांक शुल्क याबाबत लेखांचा समावेश या अंकात करण्यात आला आहे. या अंकाची किंमत 10 रुपये असून अंक स्टॉलवर सर्वत्र उपलब्ध आहे. यावेळी निवृत्त अपर मुख्य सचिव सुधीरकुमार गोयल, ग्रामविकास सचिव असिम गुप्ता, उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला, वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर, मनीषा पिंगळे, सहायक संचालक मंगेश वरकड आदी उपस्थित होते.

Leave A Comment