Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • अपक्ष उमेदवार काँग्रेस समर्थित नवनीत राणा ३६९५१ मतांनी विजयी
  • राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना दिल्या विजयाच्या शुभेच्छा
  • पालघरमधून शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी
  • बारामती येथून सुप्रिया सुळे विजयी
  • सूरतमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग, 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू
  • सूरत अग्नीतांडवप्रकरणी मालकासह तिघांना अटक, अनधिकृतपणे सुरू होते क्लासेस

कामगारांच्या हितासाठी विविध कामगार मंडळांवर समित्यांचे गठन

मुंबई,: कामगारांच्या हितासाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी व्हावी आणि कामगारांना लाभ मिळावा यासाठी व्यवस्थापन, कामगार आणि राज्य शासन यांच्यात संवाद, कामगारांच्या समस्यांवर विचार विनिमय व्हावा यासाठी माहिती तंत्रज्ञान, वृत्तपत्र विक्रेता असंघटित कामगार, सहकारी बॅंक उद्योग वेतन मंडळाची पुर्नरचना, सिनेसृष्टीतील कामगार या विविध मंडळांवर समित्यांचे गठन करण्यात आली आहे, अशी माहिती कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली. आज मंत्रालयात कामगारांच्या विविध समस्यांसदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत या मंडळांवर समित्यांचे गठन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. चित्रपट, दूरदर्शन व मालिका क्षेत्रातील कामगारांच्या समस्या त्यांना लागू होणारे कामगारविषयक व कल्याणकारी कायदे, त्यांची काम करण्याची पध्दत, त्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा व त्यांची नोंदणी व अन्य समस्यांबाबत सविस्तर अभ्यास करून शासनाला शिफारशी करण्यासाठी त्रिपक्षीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष कामगार आयुक्त असून यात व्यवस्थापन प्रतिनिधी, कामगार प्रतिनिधी, यांचा समावेश आहे. या समितीने या क्षेत्रातील कामगारांच्या सर्व प्रश्नांबाबत कामगारांशी, त्यांच्या संघटनांशी, व्यवस्थापन प्रतिनिधींशी सविस्तर विचारविनिमय करून कामगारांच्या कल्याणविषयक व अन्य बाबींसंदर्भात शिफारशींचा अहवाल सहा महिन्यात शासनास सादर करावा. वृत्तपत्र विक्रेता असंघटीत कामगारांना राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांचा लाभ प्राप्त व्हावा. असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम २००८ च्या कलम ६ (१) अन्वये गठीत करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळांअंतर्गत नोंदित होणाऱ्या वृत्तपत्र विक्रेता, असंघटीत कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ व्हावा. यासाठी अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष कामगार आयुक्त आहेत. तसेच माहिती तंत्रज्ञान व्यवसायात वेगाने होणारे बदल लक्षात घेऊन माहिती व तंत्रज्ञान (आय.टी.) क्षेत्रातील व्यवस्थापन आणि अभियंता-कर्मचारी यांच्यातील तक्रारींचे निवारण करण्याकरिता समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. बॅंकिंग रेग्युलेशन अधिनियम १९४६ च्या तरतूदी लागू असलेल्या सहकारी बॅंकांच्या उद्योगाकरिता महाराष्ट्र राज्यासाठी सहकारी बॅंक उद्योग वेतन मंडळाची पुर्नरचना करण्यात आली आहे. त्यात अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष अनिल ढुमणे असून यात अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुनर्रचित वेतन मंडळावर नितीन काळे यांचे स्वतंत्र सदस्य/प्रतिनिधी म्हणून नामनिर्देशन करण्यात आले आहे. यात कामगार प्रतिनिधी आणि मालक प्रतिनिधींचाही समावेश आहे, असेही श्री. पाटील- निलंगेकर यांनी सांगितले.

Leave A Comment