Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • अपक्ष उमेदवार काँग्रेस समर्थित नवनीत राणा ३६९५१ मतांनी विजयी
  • राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना दिल्या विजयाच्या शुभेच्छा
  • पालघरमधून शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी
  • बारामती येथून सुप्रिया सुळे विजयी
  • सूरतमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग, 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू
  • सूरत अग्नीतांडवप्रकरणी मालकासह तिघांना अटक, अनधिकृतपणे सुरू होते क्लासेस

नागपूरची माझी मेट्रो देशातील सर्वाधिक ग्रीन मेट्रो ठरेल

नागपूर, : मेट्रो रेल्वेमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार असून वाहनांचा वापर कमी झाल्याने प्रदूषण कमी होणार आहे. अधिकाधिक सौरऊर्जा प्राप्त करुन देशातील अनेक मेट्रो रेल्वेंच्या तुलनेत नागपूर मेट्रो ही अधिक ग्रीन मेट्रो अर्थात पर्यावरणपूरक मेट्रो ठरणार असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. तर 21व्या शतकातील नागपूरची सुरुवात माझी मेट्रोच्या रुपाने होत असल्याचे गौरवोद् गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले. वर्धा रोड येथील एअरपोर्ट साऊथ मेट्रो रेल्वे स्टेशन येथे नागपूरच्या माझी मेट्रोच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, महापौर नंदा जिचकार, खासदार कृपाल तुमाने, डॉ.विकास महात्मे, आमदार प्रा.अनिल सोले, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, समीर मेघे, डॉ.मिलिंद माने, प्रा.जोगेंद्र कवाडे, केंद्रीय नगरविकास विभागाचे सचिव दुर्गाशंकर मिश्र, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओलिंकद्वारे कळ दाबून माझी मेट्रोचे उद्घाटन केले. तसेच माझी मेट्रोच्या खापरी ते सिताबर्डी या प्रवासासाठी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी माझी मेट्रोच्या उभारणी संदर्भातील कॉफी टेबल बुकचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी माझी मेट्रो, ट्रान्सफॉर्मिंग नागपूर – ए ड्रीम कमींग ट्रू या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करुन सर्वांची मने जिंकली. माझी मेट्रोच्या उद्घाटनानिमित्त श्री.मोदी यांनी नागपूरकरांना भरभरुन शुभेच्छा दिल्या. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेल्या भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, नागपूर हे जगातील वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये समाविष्ट झाले आहे. माझी मेट्रोच्या रुपाने नागपूरकरांचे स्वप्न पूर्ण होत आहे. देशातील मेट्रो असलेल्या शहरांमध्ये आता नागपूरचाही समावेश होत आहे. माझी मेट्रोचे काम अतिशय वेगात व दर्जेदारपणे पूर्ण झाले आहे. मेट्रो रेल्वे संदर्भात निश्चित धोरण ठरविण्यात आले असून मेट्रोचे नेटवर्क मागील चार वर्षात 650 कि.मी.ने वाढले आहे. देशाच्या इतर भागात 800 कि.मी. मेट्रो रेल्वेची कामे सुरु आहेत. माझी मेट्रोच्या रुपाने मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीस चालना मिळाली असून यापुढेही जसजसा मेट्रोचा विस्तार होत जाईल तसतशी येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. मेट्रोच्या विस्तारामुळे शहराचा चेहरा-मोहराच बदलणार आहे. याबरोबरच आता ‘वन नेशन वन कार्ड’ ही संकल्पना साकारण्यात येत असून या एका कार्ड अंतर्गत विविध परिवहन व्यवस्थेचा प्रवाशांना लाभ घेता येणार आहे. डिजिटल भारत अशी देशाची नवी ओळख तयार होत असून देशातील युवक विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करुन पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोलाची भूमिका बजावत असल्याचे श्री. मोदी यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझी मेट्रोचे उद्घाटन हा नागपूकरांसाठी ऐतिहासिक व आनंदाचा क्षण आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक विकसित व बळकट झाल्यास शहराच्या विकासाला हातभार लागतो. माझी मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार असून वाहनांची संख्या कमी झाल्यामुळे प्रदूषणाला आळा बसणार आहे. चांगल्या आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे माझी मेट्रो हे प्रतिक ठरणार आहे. पर्यावरणपूरक असणाऱ्या या मेट्रोमुळे ऊर्जेची बचत होईलच याबरोबरच कार्बन उत्सर्जनाला आळा बसणार आहे. माझी मेट्रोसाठी 65 टक्के ऊर्जा ही सौरऊर्जेतून प्राप्त होणार आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. परिवहनपूरक विकास ही संकल्पना आता महत्वाची ठरणार आहे. माझी मेट्रो ही अन्य परिवहन व्यवस्थेला जोडण्यात येणार असल्याने प्रवाशांचा प्रवासामध्ये खर्च होणारा वेळ व शक्ती वाचणार आहे. मेट्रोच्या परिसरात विविध विकासात्मक कामेही हाती घेण्यात येणार आहेत. माझी मेट्रोची स्टेशन्स ही परिसरातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरणार आहे. यातून सेवाक्षेत्राद्वारे मोठ्या रोजगार संधी निर्माण होणार आहेत. माझी मेट्रो हा नागपूरचा नवा चेहरा, नवी ओळख ठरणार आहे. नागपूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामही लवकरच सुरु होत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, अतिशय कमी वेळेत व दर्जेदार स्वर

Leave A Comment