Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

जागतिक महिलादिनानिमित्त कर्करोग तपासणी मोहिम शहरात रॅली

अमरावती, दि. 8 : जागतिक महिलादिनानिमित्त आरोग्य विभागातर्फे कर्करोग तपासणी मोहिम व शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले. इर्विन रूग्णालयात कर्करोग तपासणी मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्याहस्ते करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ही मोहिम आजपासून दि. 9 एप्रिलपर्यंत चालविण्यात येणार आहे. महिलांनी स्वत:च्या आरोग्याप्रती जागरूक राहिले पाहिजे. आरोग्याची वेळोवेळी तपासणी करून घेणे आवश्यक असते. त्यासाठी अशा मोहिमा उपयुक्त ठरतात, असे श्रीमती खत्री यांनी सांगितले. इर्विन रूग्णालयात जनजागृती रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. डॉ. निकम यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. नेहरू स्टेडियम येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. श्रीमती खत्री यांच्यासह पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर हेही समारोपप्रसंगी उपस्थित होते. डॉ. तृप्ती जवादे, मेट्रन मंदा गाढवे, डॉ. मिसर, डॉ. शंतनू राऊत, डॉ. रामदास देवघरे, पवन दारोकर, अमित देशमुख, अमित वानखडे, पांडुरंग गोलमालू उपस्थित होते. उमेश आगरकर यांनी सूत्रसंचालन केले. उद्धव जुकरे यांनी आभार मानले.

Leave A Comment