Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

१६ फेबु.चा पांढरकवडा येथील पतंप्रधान नरेंद्र मोदीं यांचा महीला व आदिवांसीचा मेळावा

स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा भारताचे पतंप्रधान यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम शेतकरी आत्महत्याग्रस्त आदिवासीभागात महीला व आदिवांसीचा मेळावा घेऊन त्यांच्या वेदना व पॅकेज देण्यासाठी येत्या १६ फेबु .ला पांढरकवडा येत असुन या संधीचे सोने करण्यासाठी केळापूर ,झरी ,घाटंजी ,राळेगाव ,मारेगाव तालुक्यातील सर्व जनता आतुरतेनी वाट पहात असुन यापूर्वी २००६मध्ये तात्कालीन पंतप्रधान मन मोहनसिंग कोळझरीला येणार होते मात्र त्यांना त्यावेळचे महाराष्ट्राचे मंत्र्यांनी येऊ दिले नाही याची खंत आज पर्यंत आहे मात्र यावेळी ही आलेली संधी साधून महीला बचत गट कोलाम पारधी तसेच दलितांना विषेय भरीव मदतीचे पॅकेज घेण्याचा विश्वास कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी केले . या भागातील सर्व आदिवासी कार्यकर्ते अंकित नैताम सुरेश बोलेनवर मोहन जाधव बाबुलाल मेश्राम भीमराव नैताम यांच्या नेतृत्वात कामाला लागले असुन या मेळाव्यात हजारो आदीवासी उपस्थित राहणार अशी माहीती तिवारी यांनी यावेळी दिली . या मेळाव्याला अभूतपूर्व करण्यासाठी १३ फेबु.ला दुपारी ३ वाजता सुराणा भवन सुराणा जिनिंग येथे केळापूर ,झरी ,घाटंजी ,राळेगाव ,मारेगाव तालुक्यातील सर्व महीला बचत गटाच्या सहयोजणींचा व संघटण प्रमुख यांचा सर्व लोकप्रतिनिधी ,जिल्हाधिकारी यवतमाळ ,मुख्य कार्यपालन अधिकारी यवतमाळ पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या उपस्थितीत तयारीसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे . या कार्यशाळेला केळापूर ,झरी ,घाटंजी ,राळेगाव ,मारेगाव तालुक्यातील सर्व ग्रामसेवक तलाठी कृषी सहायक पोलीस पाटील यांनी उपस्थित राहनार आहेत .कार्यशाळेची जबाबदारी जिल्हाप्रशासनाकडे सोपविण्यात आली आहे . केळापूर ,झरी ,घाटंजी ,राळेगाव ,मारेगाव तालुक्यातील तहसीलदारांनी सर्व महीला बचत गटाच्या सहयोजणींचा व संघटण प्रमुख यांना जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या सूचना द्यावी तसेच सर्व माननीय खासदार व आमदारांना निमंत्रित करणे प्रशासनाला गरजेचे असल्याचे किशोर तिवारी कळविले आहे .

Leave A Comment