Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

वस्त्रोद्योग धोरण अंतर्गत घटकांच्या ऑनलाईन नोंदणीस आरंभ

अमरावती, : दि. 21 डिसेंबर 2018 च्या शासन निर्णयान्वये राज्याच्या वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत विजदर सवलतीस पात्र ठरणाऱ्या वस्त्रोद्योग घटकांना संचालनालयाच्या https://www.dirtexmah.gov.in वेबसाईटवर दिनांक 31 जानेवारी 2019 पर्यंत आवेदन करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यात वाढ करुन आता दिनांक 15 फेब्रुवारी 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सर्व वस्त्रोद्योग घटकांनी सामान्य नोदणी व विजदर सवलतीचे आवेदन वाढीव मुदतीत विभागाच्या संकेतस्थळावर किंवा कार्यालयास सादर करावे, असे आवाहन वस्त्रोद्योग संचालक डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

Leave A Comment