Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

जनमानसात स्‍वच्‍छतेचा विचार रूजविला पाहिजे के सी मोरे , सहायक प्राध्यापक, अमरावती विद्यापीठ, यांचे प्रतिपादन

अमरावती ः भारत सरकारने सुरू केलेल्‍या स्‍वच्‍छता अभियानाचा प्रचार-प्रसार मोठयाप्रमाणावर करण्‍याकरिता जनमानसात स्‍वच्‍छतेचा विचार रूजविला पाहिजे. विद्यार्थ्‍यांनी स्‍वच्‍छतेचे दूत बनून सामूदायिक आणि सामाजिक स्‍वच्‍छतेतून परिसर स्‍वच्‍छ व निरोगी ठेवण्‍याचा संकल्‍प करावा, असे प्रतिपादन अमरावती विदयापीठाचे वनस्पती शास्त्र विभागाचे प्राध्यापक के सी मोरे यांनी केले. चांदूर रेल्वे येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारच्‍या फील्‍ड आउटरीच ब्‍यूरो, अमरावती यांच्‍या विद्यमाने आयोजित केंद्र सरकारच्‍या विविध कल्‍याणकारी योजनांचा प्रचार-प्रसार व जागृती व प्रबोधन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्‍हणून बोलत होते. गुरुवार, 7 फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शासकिय तंत्र माध्यमिक शाळेचे प्राचार्य एस एल वानखडे होते. यावेळी मंचावर फील्‍ड आउटरीच ब्‍यूरोचे अधिकारी अंबादास यादव, नायब तहसिलदार डी आर सवाई, कृषी सहायक एन बी अंधारे, स्वच्छ भारत मिशन समंव्यक श्रीमती मशतकर, आयटीआय प्राचार्य एस एस पाटबागे, गटनिदेशक डी टी शिंगणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन निदेशक प्रशांत टांगले यांनी केले तर आभार गजानन बडांगे यांनी मानले. प्राध्यापक मोरे पुढे म्‍हणाले, स्‍वच्छता ही प्रत्‍येकाने स्‍वत:च्‍या आरोग्‍याकरिता आवश्‍यक बाब आहे, त्‍यासाठी आपण दैनंदिन जीवनात स्‍वच्छतेचा अवलंब केला पाहिजे. पाणी, हवा आणि पर्यावरण शुद्ध ठेवण्‍यासाठी स्‍वच्छता अंगी बाळगणे गरजेचे आहे, असेही ते म्‍हणाले. क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव यांनी प्रास्‍ताविकातून केंद्र सरकारच्‍या स्‍वच्‍छ भारत अभियानासह विविध जनकल्‍याणकारी योजनांची माहिती दिली. कृषी सहायक एन बी अंधारे आणि श्रीमती मसतकर यांनी बेटी बचाओ बेटी पढाओं आणि कृषी योजनावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार डी आर सवाई यांनी व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनविषयी सविस्तर माहिती सह प्रात्यशिक देण्यात आले अध्‍यक्षीय भाषणात प्राचार्य एस एल वानखडे म्‍हणाले, विद्यार्थ्‍यांनी महाविद्यालयात तर स्‍वच्‍छता ठेवलीच पाहिजे शिवाय घर आणि परिसरातही स्‍वच्‍छता राखली पाहिजे. स्‍वच्‍छता ही आरोग्‍याची गुरुकिल्‍ली होय असेही ते म्‍हणाले. या अभियानाच्‍या अंतर्गत स्‍वच्‍छता व आरोग्‍य, लेक वाचवा, लेक शिकवा, पर्यावरण या विषयावर संदेश देणारी रांगोळी व निबंध स्‍पर्धा घेण्‍यात आली. रांगोळी स्‍पर्धेचा प्रथम, द्वितीय, तृतीय, चवथा पुरस्‍कार अनुक्रमे अनिता नेवारे, पूजा राउत, शारदा मेश्राम, ऋषीका चौधरी यांना तर चित्रकला स्‍पर्धेचे पुरस्‍कार शुभम रेखे, अजय दारोकार, शुभम सुरजुसे, योगिता डोंगरे आणि पूजा पांडे यांना देण्‍यात आले. विजेत्‍यांना पाहुण्‍यांच्‍या हस्‍ते पुसस्कार आणि प्रमाणपत्र प्रदान करण्‍यात आली. कार्यक्रमाआधी स्‍वच्‍छता रॅली काढण्‍यात आली. कार्यक्रमाला निदेशक एच व्ही चांदूरकर, एम बी मर्दाने, मंडळ अधिकारी एस डी गोसावी, तलाठी आर एस मलमकर, अजय देशमुख, श्रीकांत जाभूळकर, प्रदिप सोनेकर यांच्‍यासह विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Leave A Comment