Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील पुस्तकाचे पालकंमत्री प्रविण पोटे पाटील यांच्या हस्ते विमोचन

अमरावती डॉ विश्राम निळकंठ बापट लिखित जानिये मन…अपने प्रधानमंत्री का या पुस्ताकाचे विमोचन पालकमंत्री प्रविण पोटे पाटील यांच्या हस्ते अमरावती येथे करण्यात आले. डॉ विश्राम बापट यांनी पुस्तका विषयी भुमिका स्पष्ट करतांना सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अंतरंग जनमानसात रुजावे त्यांचे बहुमोल विचार जनसामान्यांना कळावे या उद्देशाने 1999 ते 2014 या कालखंडातील नरेंद्र मोदींच्या निवडक व मार्मिक प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतींचे संकलन व लेखन या पुस्तकात करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुळ शब्दामध्येच पुस्तक शब्दबध करण्यात आले आहे.यावेळी पालकमंत्री प्रविण पोटे पाटील म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखे नेतृत्व देशाला लाभल्याने देश प्रगतीपथावर आहे.जगाात भारताचे नाव आज सन्माने घेतल्या जात आहे .त्यांचे व्यक्तिमत्वाचे कंगोरे जाणुन घेण्यासाठी प्रत्येकाने जानिये मन…अपने प्रधानमंत्री का हे पुस्तक आवर्जुन वाचावे असे आहे. पालकमंत्री जनसंपर्क कार्यालय अमरावती

Leave A Comment