Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील आज जिल्ह्यात

अमरावती, : पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील हे दि. 9 व 10 रोजी अमरावती जिल्हा दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : दि. 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 5.50 वाजता अमरावती येथे आगमन व शासकीय मोटारीने राठीनगर निवासस्थानाकडे प्रयाण, सकाळी 6.30 वाजता राठीनगर निवासस्थान येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वाजता राठीनगर निवासस्थान येथून शासकीय मोटारीने वरुडकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता वरुड येथील स्वामीनाथन सभागृहात राष्ट्रीय कृषी विकास परिषदअंतर्गत महाराजस्व अभियान कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2 वाजता वरुडहून शासकीय मोटारीने अमरावतीकडे प्रयाण, सायं. 5.30 वाजता अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ खासदार आनंदराव अडसूळ यांचे मानसकन्येच्या सामाजिक विवाह सोहळ्यास उपस्थिती. सोईनुसार राठीनगर निवासस्थान येथे आगमन व राखीव. रविवार, दि. 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता राठीनगर निवासस्थान येथून शासकीय मोटारीने प्रयाण. स्थानिक विविध कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 5 वाजता राठीनगर निवासस्थान, अमरावती येथे आगमन व राखीव. सायं. 6.15 वाजता वाजता राठीनगर निवासस्थान अमरावती येथून शासकीय मोटारीने बडनेरा रेल्वे स्टेशनकडे प्रयाण व सायं. 7.57 वाजता बडनेरा रेल्वे स्टेशन येथे आगमन व विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईकडे प्रयाण.

Leave A Comment