Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

उभी असलेली 3 ट्रैवल्स बस खाक

अमरावती: (सिटी न्यूज, प्रतिनिधी) गनेडीवाल ले आऊट मधील विभागीय आयुक्तालयाच्या अगदी बाजूला रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या 3 ट्रॅव्हल्स ला रात्री 11 वाजून 15 वाजता आग लागून 3 नहीं ट्रॅव्हल्स बस जळून खाक झाल्या... जय गजानन भाग्यलक्षमी ट्रॅव्हल्स क्रमांक mh04 fk 0295......mh 04 fk 0294.... Mh 07 c8600 क्रमांक च्या तीनही ट्रॅव्हल जळून बेचिराख झाल्या घटनेची माहिती नागरिकांनी अग्निशमन विभागाला दिल्यावर 3 वाहन दाखल होऊन आगीवर नियंत्रण आणण्यात आले ट्रॅव्हल्स मालक शीतेज उमक, मोहंमद कबीर अली खान.,दीपक ओमप्रकाश शर्मा हे वेग वेगळ्या ट्रॅव्हल्स चे मालक असून यात 75 लाखाचे नुकसान झाले या आगीत फक्त ट्रॅव्हलचे टायरच वाचले घटना स्थळी उमक यांच्या काकांचे घर आहे तसेच बाजूला फ्लॅट आहे या ठिकाणी नेहमी वाहन पार्किंग केल्या जात होती सकाळी जवळच असलेल्या वेलकम पॉईंट्स पावर हाऊस येथून पुणे येथे ट्रॅव्हल्स जात असे.... घटना स्थळी काळोख असल्यामुळे तीनही ट्रॅव्हल्स मध्ये 20 फूट अंतर असताना सुद्धा मोठया प्रमाणात आगीने रूद्र रूप धारण केले होते या आगी मध्ये संशयाने सर्व नागरिक मध्ये चर्चा निर्माण झाली या घटनेत आग विझणाऱ्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी श्रीकांत जवंजाळ हे किरकोळ जखमी झाले असता त्यांनी वाहन सह इरविन मध्ये गेले असता तेथे त्यांना 10 रुपये ची पावती फाडावी लागेल तेव्हा उपचार केला जाइल असे सांगितले मात्र अचानक आगीच्या ठिकाणी जावे लागल्याने पैसे जवळ नव्हते इरविनच्या कर्मचारीनी पोलिसांना मोफत उपचार केला असता परंतु या ठिकाणी ताटकळत बसलेल्या अग्निशमन कर्मचारिनी शेवटी त्यांच्या अधिकारी सय्यद यांना फोन केला त्यांनी डॉक्टर पांडे यांना समजून सांगितले सिटी न्यूस चे प्रतिनिधी नी डॉक्टर ना संपर्क केला असता शेवटी उपचार केला गेला

Leave A Comment