Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

आझाद हिंद मंडळाद्वारे आयोजित कुमार गट कबड्डी स्‍पर्धेत गुरुदेव क्रिडा मंडळ चमक विजेता तर संघर्ष क्रिडा मंडळ, कोळंबी उपविजेता

स्‍थानिक आझाद हिंद मंडळ बुधवारा अमरावती च्‍या वतीने मंडळाचे माजी कबड्डीपटु स्‍व. बाळासाहेब दिघेकर व स्‍व. सुभाषभाऊ पुसतकर यांच्‍या स्‍मृती प्रित्‍यर्थ आयोजित कुमार गट कबड्डी स्‍पर्धेत विजेतेपद गुरुदेव क्रिडा मंडळ (चमक) अचलपूर तर उपविजेतेपद संघर्ष क्रिडा मंडळ कोळंबी (दर्यापूर) यांनी पटकाविले. या दोन संघामध्‍ये झालेल्‍या अंतिम सामन्‍यात चमक च्‍या संघाने कोळंबी संघावर 36-20 अशी मात केली. चमक संघाचा आंतर राष्‍ट्रीय शालेय खेळाडू संदिप वरखडे याने दमदार चढाया करत सुरुवातीपासूनच चमक संघाचा आघाडी प्राप्‍त करुन दिली त्‍याच्‍या चमक संघाच्‍या इतर खेळाडूंची सुध्‍दा साथ लाभली. तत्‍पूर्वी झालेल्‍या उपात्‍य सामन्‍यात गुरुदेव क्रिडा मंडळ चमक या संघाने बजरंग क्रिडा मंडळ अमरावती या संघावर मात करुन अंतिम फेरीत प्रवेश केला तर संघर्ष क्रिडा मंडळ कोळंबी या संघाने शिव छत्रपती क्रिडा मंडळ अमरावती या संघावर मात करुन अंतिम फेरी गाठली. या स्‍पर्धेतील विजेत्‍या चमक संघाचा 31 हजार रुपये रोख तर उपविजेता कोळंबी संघाचा 21 हजार रुपये रोख बक्षिस देवून गौरविण्‍यात आले तर स्‍पर्धेत उत्‍कृष्‍ट खेळ करणा-या प्रत्‍येक संघाच्‍या खेळाडूंचा वैयक्तिक बक्षिस देवून गौरविण्‍यात आले. स्‍पर्धेचा बक्षिस वितरण सोहळ्यात मा.श्री. बबलुभाऊ शेखावत विरोधी पक्षनेता, मा.श्री. दिनेश बुब अपक्ष गटनेता, समाजसेवक, मा.श्री. विवेक कलोती स्‍थायी समिती सभापती, मा.श्री.राजुभाऊ महल्‍ले, अध्‍यक्ष राष्‍ट्रवादी कॉंग्रेस मा.श्री.विलासभाऊ इंगोले माजी महापौर, मंडळाचे कार्याध्‍यक्ष राजाभाऊ मोरे, अॅड. चंदुभाऊ डोरले, प्रकाश भाऊ संगेकर, दिलीपभाऊ कलोती, प्रमोद इंगोले संचालक कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती, बाबासाहेब सपकाळ, नितीनभाऊ इंगोले, जयंत कलोती, सदानंद आप्‍पा कु-हे, राजुभाऊ नवाथे इत्‍यादी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाला. या प्रसंगी अमरावती ते पुणे व पुणे ते मुंबई असा 950 किलो सायकलने प्रवास करुन आपली व्‍यवस्‍थापनाचे प्रचार प्रसार करणा-या तिन पोलीस बंधु यांच्‍या मान्‍यवरांच्‍या हस्‍ते शाल, श्रीफळ व पुष्‍पगुच्‍छ देवून सत्‍कार करण्‍यात आला. या स्‍पर्धेत एकुण 22 संघानी सहभाग नोंदविला व तिनही दिवस क्रिडा रसिकांनी प्रचंड गर्दी सामने पाहण्‍यासाठी केली होती. या प्रसंगी मंडळाचे सर्व सदस्‍य, सर्व श्री. दिलीप दाभाडे, नंदकिशोर गुबळे, ज्ञानेश्‍वर हिवसे, प्रा. गणेश मालोकर, किशोर बोराटने, संतोष बद्रे, राजु डांगे, संजय वाकोडे, सतिश चौधरी, नितीन सराफ, नितीन फुसे, भुषण पुसतकर, सखाराम जोशी, आकाश मोरे, योगेश पुंड, अजय पुसतकर, धनराज यादव, आशिष माड, गणेश वडुरकर, सुमित विंचुरकर, समिर कर्णे, प्रविण चौधरी, पंकज सराफ, अनिकेत नवघरे, निलेश सराफ, मनिष चौधरी, मनोहर चौधरी, अनिल काळे, मयुर जलतारे, रोशन पुसतकर, शुभम काशिकर, परेश कोरे, ऋषीकेश गाडगे, प्रविण फुलारी, विशाल चावंडे, स‍नी चव्‍हाण, बबु बोरखडे यांच्‍यासह अनेक क्रिडा रसिक उपस्थित होते. स्‍पर्धेच्‍या यशस्‍वीते करीता मंडळाच्‍या सर्वच कार्यकर्त्‍यांनी परिश्रम घेतले. संपुर्ण कार्यक्रमाचे संचालन संजय मुचळंबे यांनी केले.

Leave A Comment