Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

सर्व शासकीय कार्यालयांनी मतदार जागृती मंच स्थापन करावेत

अमरावती, दि.22 : जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात मतदार जागृती मंच स्थापन करण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी दिले आहेत. राज्याचे मुख्य सचिव यांनी याबाबत सर्व जिल्ह्यांना सूचित केले आहे. त्यानुसार अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच मतदार जागृती मंच स्थापन करण्यात आला. शहरी तसेच शिक्षित मतदारांमध्ये जागृतीसाठी शासकीय कार्यालये व इतर संस्था यांनी महत्वाची भूमिका वठविणे आवश्यक आहे. मतदार नोंदणी, निवडणूक प्रक्रिया, तसेच मतदारांमध्ये मताच्या हक्काची जाणीव करुन देणे हा या मतदार जागृती मंचाचा उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले. सर्व शासकीय कार्यालयात तसेच संस्थामध्ये मतदार जागृती मंचाची स्थापना करण्यात यावी व या माध्यमातून मतदारांमध्ये तसेच शासकीय कर्मचा-यांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण करण्यात यावी. प्रत्येक कार्यालयप्रमुखाने याबाबतची कार्यवाही तत्काळ करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. देशमुख यांनी दिले. उप जिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Comment