Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

गिरीश बापट आणि अजित पवार यांच्यात रंगली शाब्‍दिक टोलेबाजी

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज पालकमत्री गिरीश बापट आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील शाब्‍दिक टोलेबाजी चांगलीच रंगली. प्रशासन चालवत असताना कठोर कसे रहावे याचा सल्ला माजी पालकमंत्री अजित पवार यांनी सध्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना दिला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे विधानभवन येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ही शाब्दीक चकमक झाली. देवस्थानांना तिर्थक्षेत्राचा दर्जा देण्यावरुन चर्चा सुरु होती. त्यावेळी अजित पवार म्हणाले, देवस्थान किती मोठे आहे, तेथे वर्षाला किती भाविक येतात, अशा सर्व गोष्टींचा विचार व्हायला हवा. कोणी मागणी केली म्हणून एखाद्या देवस्थानला तिर्थक्षेत्र म्हणून घोषीत करायला नको. त्यावर, बापट म्हणाले, तिर्थक्षेत्र घोषीत करण्यासाठी नियमावली ठरविली आहे. या नियमावलीच्या आधारेच एखाद्या देवस्थानला तिर्थक्षेत्राचा दर्जा द्यायचा की नाही, हे ठरविले जाते. मात्र, अनेकदा देवस्थानला तिर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, यासाठी राजकिय दबाव टाकला जातो. त्यामुळे काही वेळेस नियम पाळले जात नाही. तिर्थक्षेत्राच्या विषयावरुन अजित पवार बापट यांना म्हणाले, पालकमंत्र्यांनी कसे कठोर रहावे कठोर, तर त्यांना उत्तर देताना बापट म्हणाले, दादा आता तुमचा आदर्श घेतो आणि कठोर राहतो. दोन आजी माजी पालकमंत्र्यांच्या टोलेबाजीमुळे उपस्थित खासदार, आमदार, आणि सरकारी अधिकार्‍यांनाही हसू आवरता आले नाही. बापट यांनी सांगितलेले कारण ऐकताच पवार म्हणाले, पालकमंत्र्यांनी कसे कठोर रहावे कठोर. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता, बापट म्हणाले, दादा आता तुमचा आदर्श घेतो आणि कठोर राहतो. यावर दोन्ही नेते हसू लागले. मात्र, दोन आजी माजी पालमंत्र्यांच्या या शाब्दिक टोलेबाजीची बैठकीत चांगलीच चर्चा रंगली.

Leave A Comment